• pic
 • भक्तीची परंपरा महाराष्ट्राला पूर्वापकाळापासून चालत आलेली आहे, त्याचप्रमाणे गावात हि परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. संपूर्ण गावाचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत म्हणजे हनुमंतराया. या ग्रामदैवताची सेवा, भक्ती आणि नामघोषाकरिता पूर्वीच्या काळी हनुमंत रायाच्या मंदिरात सात दिवसांचा पहारा आयोजित केला जात असे. पहारा दिवसरात्र अविरत चालत असे ऱात्रि भारूडांचे व भजनाचे कार्यक्रम होत असे. देवजी गोपाळा चौधरी ,रखमाजी कोंडाजी झिंजाड ,गणपत बळवंत चौधरी, दगडु चौधरी, सुदाम यशवंत चौधरी, विष्णुबुवा झिंजाड, लोभा नारायण चौधरी, बाबाजी रामभाऊ चौधरी, शिवराम निमसाखरे, भाऊ नामदेव झिंजाड, आबा झिंजाड यांची मोलाची साथ व सहकार्य असायचे.
  भाऊ नामदेव झिंजाड यांच्या स्मरणार्थ गावातील उमाजी झिंजाड,किसन भगवंत चौधरी,बारकुबुवा शिंदे, तबाजी भाऊ झिंजाड, आनंथा चौधरी, हनुमंत महाराज झिंजाड, प्रभू शिंदे, जयराम झिंजाड, पिराजी झिंजाड, बाजीराव शिंदे, भाऊ पाटील झिंजाड यांनी भारुडी भजनाचे कार्यक्रम चालू केले . हा कार्यक्रम आपल्या दिंडीच्या वेळेस आपल्या गावी करण्यात यावा असा प्रस्ताव म्हातारबा विठोबा चौधरी ,बाळशिराम झिंजाड ,शंकर नाना उजघरे व भास्कर झिंजाड यांनी मुंबईच्या फंडात मांडला तेव्हा पासून ट्रक भरून गारखिंडीचे मुंबईकर या दिंडी सोहळ्याकरिता येत. ग़ावातुन देवराम भाडळे ,बाजीराव भाडळे ,गेणभाऊ देवजी चौधरी ,किसन झिंजाड ,बाबाजी रामभाऊ चौधरी साथ करत.

  यातून प्रेरणा घेऊन सण १९७८ साली वैकुंठवासी ह. भ. प. कोंडाजी बाबा डेरे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली गावात अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात झाली. ह.भ.प. केशव महाराज जगदाळे, मुरलीधर तात्या कुलकर्णी, कै विष्णुबुवा झिंजाड, कै गणपत बळवंत चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली. हनुमंत रायाच्या मंदिरात सात दिवसाचा पहारा आयोजित केला जात असे. हा पहारा दिवस रात्र अविरत चालत असे. रात्री भारूडांचे आणि भजनाचे कार्यक्रम होत असत. पुढील काळातकै. शिवराम निमसाखरे, कै. सीताराम देवाजी चौधरी, श्री. हनुमंत महाराज झिंजाड, श्री तुकाराम रखमा झिंजाड, श्री रावजी भाऊ झिंजाड, श्री मुरलीधर महादू चौधरी यांची उत्तम साथ लाभली. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्ष हरीनाम सप्ताहाचे नियोजन होत राहिले. या सगळ्यात महत्वाचे नाव म्हणजे ह. भ.प. हनुमंत महाराज झिंजाड. कितीतरी वर्षापासून सप्ताहाचे आयोजन आणि नियोजन महाराज मोठ्या उत्साहाने पार पाडतात. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सप्ताहाच्या निमित्ताने गावात पाचारण करून सर्व ग्रामस्थांना श्रवणसुखाचा आनंद मिळवून देण्यात महाराजांचे योगदान खूप मोठे आहे. श्री. गेनभाऊ चौधरी, श्री. दत्तात्रय निमसाखरे, श्री. जालिंदर चौधरी यांची हि नियोजनाच्या कामात मोलाची साथ असते.

  सात दिवसाच्या या उत्सवात शेवटच्या दिवशी सगळ्या गावाला दिंडी प्रदक्षिणा आणि काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. सण २००२ साली अखंड हरीनाम सप्ताहाची २४ वर्ष म्हणजे २ तप पूर्ण झाली. त्यावर्षी संपूर्ण गावाने ११ दिवसाचा पंढरी सोहरा साजरा केला. पंढरीच्या काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायक, वादक बोलावण्यात आले होते. अकरा दिवस रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

  ह.भ.प रंगनाथ गुरुजी झिंजाड यांच्या शुभहस्ते मारुतीरायचा महाअभिषेक करून वीणा पूजन करून दरवर्षी सप्ताहाला प्रारंभ होतो. सण २०१४ साली सप्ताहाला ३६ वर्ष पूर्ण झाली. सर्वानुमते त्रितपपुरती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. अकरा दिवसाचा हा सोहळा न भूतो न भाविषति अश्या स्वरूपाचा संपन्न झाला. संतवीर बंड्या तात्या कऱ्हाडकर, रमेश महाराज कुलकर्णी, उमेश महाराज दशरथे, ज्ञानेश्वर महाराज कदम, पांडुरंग महाराज गिरी, पांडुरंग महाराज घुले, निवृत्ती महाराज देशमुख, भास्कर महाराज गिरी अशा नामवंत महात्मांची कीर्तने व रामायनाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. सर्व दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा दिंडी सोहळा अदभूतपूर्ण होता. अशा या पर्वणीचा लाभ संपूर्ण गावाबरोबरच पंचक्रोशीनी घेतला सालाबाद प्रमाणे पुढेही हा कार्यक्रम असाच सुरु आहे.

  हा कार्यक्रम म्हणजे गावातील सर्वात मोठा कार्यक्रम आणि गावच्या लोकवर्गणीतून पार पडतो. कै. रामभाऊ सावळेराम निमसाखरे यांनी सुरवातीला गावचे खजिनदार म्हणून काम पहिले त्यांच्या नंतर श्री. मुरलीधर महादू चौधरी नंतर श्री.शंकर धोंडिभाऊ उजघरे यांनी उत्तम रितीने पहिले. सध्या श्री विनायक गणपत झिंजाड व श्री निवृत्ती बबन चौधरी हे खाजीनदाराचे काम उत्तमरित्या पाहत आहेत सर्वांच्या सहभागातून अखंड हरीनाम सप्ताह दरवर्षी मोठ्या उच्हात साजरा होतो.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!