• pic
 • अहमदनगर शहरापासून सुमारे ७० किमी आणि पुणे शहरापासून सुमारे १२५ किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत गारखिंडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावाच्या तीनही बाजूला डोंगर आणि आणि एका बाजूस मैदान आहे. डोंगर परिसरातून अनेक नदी नाले उगम पावून ते गावात प्रवेश करतात. डोंगराच्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले छोटेसे पण टुमदार गाव म्हणजे गारखिंडी.गावाचे संपूर्ण क्षेत्रफळ सुमारे ९०२ हेक्टर आहे त्यापैकी बहुतांश जमीन काळी कसदार आणि मूरमाड स्वरुपाची आहे. १०६ हेक्टर क्षेत्र ओलीताखालाचे आहे तर ५९६ हेक्टर जिरायती क्षेत्र आहे. गावाला १४१ हेक्टर वनक्षेत्रहि लाभलेले आहे. पूर्वी पाणी मुबलक प्रमाणात होते पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पावसाचे प्रमाण घटले तसेच शेतीतही बदल झाला. आता शेतात ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, कांदा व कडध्यान्ये ई. पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

  गावाची कुटुंबसंख्या २५० तर लोकसंख्या १९७० आहे. गावाची ग्रामपंचायत सन १९५८ साली अस्तित्वात आली. कै.रामभाऊ सावळेराम निमसाखरे हे गावाचे पहिले सरपंच झाले. गावात विविध जाती-धर्माचे लोक मोठ्या गुण्या-गोविंदाने राहतात.

  गावाला पुरातन काळापासून एक धार्मिक परंपरा लाभलेली आहे. अमरीष नावाचे महान साधू पुरुष गावात पुरातन काळी वास्तव्यास होते. त्यांनी डोंगरातल एका भागात तपशर्या पूर्ण केली त्यामुळे त्या भागाला "आंबदरा" असे नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. संत ज्ञानेश्वर महाराज पैठण वरून आळंदीला शुद्धिपत्रक घेवून जात असताना त्यांचे या गावात वास्तव्य होते. पुढे आळे इथे रेड्याची समाधी आहे, त्यामुळे हि आख्यायिका सत्य आहे असे वाटते. याच आंबदऱ्यामध्ये पुरातन शिवमंदिर आहे ते गारेश्वर नावाने संबोधले जाते. प्रसिद्ध असे कोरथन खंडोबा मंदिर गावापासून ४ किमी अंतरावर आहे. संपूर्ण गावाची अतोनात श्रद्धा असलेले हनुमंत रायाचे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. श्रावण महिन्यात मंदिरासमोर हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. संपूर्ण गाव या कार्यक्रमात सहभागी असते. विठ्ठल रुखमाई मंदिराचा २०१४ साली लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला. सुंदर वस्तू गावात उभी राहिली. त्याच बरोबर गावात पीर साहेबाचा दर्गा, मळगंगा आणि लिंबामाता मंदिर, भैरवनाथ मंदिर, यमाई मंदिर, खंडेश्वर मंदिर गोसावी बाबा मंदिर, चारंगबाबा मंदिर इत्यादी श्रद्धास्थाने आहेत. महाशिवरात्रीला गारेश्वराचा उत्सव साजरा होतो. पिराचा तसेच इतर देवी देवतांचे उत्सवही ठराविक तिथीनुसार साजरे केले जातात.

  दिवाळीच्या सणाला, बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर संपूर्ण गाव मिळून दीपोत्सव साजरा करते. सगळ्या मंदिराचा परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. याच दिवशी मारुती रायाचा महारुद्र अभिषेक संपन्न होतो. गावात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो. जय हनुमान बहुउद्देशीय प्रतिष्ठान, श्री गणेश तरुण मित्र मंडळ, पिरसाई मित्र मंडळ, श्री खंडेश्वर मित्र मंडळ- खळवाडी, अचानक मित्र मंडळ,भाडळेमळा हि मंडळे गणेशोत्सवाचे आयोजन करतात. शिवझुंजार कला क्रीडा सांस्कृतिक आणि सार्व.नवरात्रोत्सव मंडळ नवरात्र उत्सवाचे आयोजन करते. अशा प्रकारे गावात विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात. भीमज्योत मित्र मंडळ गावात आंबेडकर जयंती आणि बौद्ध पोर्णिमा साजरी करतात.

  गावात भेडसावणार सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी. त्यावर तोडगा काढत सर्व गावकर्यांनी एकत्र येवून काम करण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. त्यासाठी श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान नावाचे मंडळ स्थापन करून काम सुरु करण्यात आले आहे. सर्वांच्या मदतीने पाणी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  गावात इयत्ता सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेला आतापर्यंत खूप उत्तम शिक्षक लाभलेले आहेत. शाळा आणि परिसरात वृक्ष लागवडीचे काम केलेले आहे. प्रसन्न वातावरणात ज्ञानार्जनाचे काम संपन्न होते.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!