अचानक मित्र मंडळ,भाडळेमळा

  • गावापासून थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या भाडळे वस्तीवरील महिला, वृद्ध आणि बालकांना गणेशोत्सवात सहभागी होता येत नाही. हि गोष्ट लक्ष्यात घेवून सण १९९३ साली श्री. दत्ता दगडू भाडळे या ध्येयवेड्या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली वस्तीवरील सर्व तरुणांनी एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले. सर्व गोष्टी एवढ्या तातडीने आणि अचानक झाल्या कि मंडळाने त्यांचे नावही "अचानक मित्र मंडळ" ठेवले. मंडळातले सगळे तरुण हे गणेश मित्र मंडळाचे हि सदस्य आहेत. तिथेही सगळ्यांचा सक्रिय सहभाग असतो.

    वस्तीला लागुनच गोसावी बाबाचे मंदिर आहे. अचानक मित्र मंडळाच्या नियोजनाखाली दरवर्षी गोसावी बाबाचा यात्रा उत्सव मोठ्या धूम-धडाक्यात साजरा होतो. मंडळाचे सगळे कार्यकर्ते गावाच्या प्रत्येक विकासकामात खूप सक्रिय असतात. मंडळ लहान असले तरी गावाच्या प्रगतीत त्यांचा वाटा खूप महत्वाचा आहे. मंडळाची वाटचाल अतिशय उत्तम चालू असून नावाप्रमाणेच गावाच्या विकासासाठी झटणारे कार्यकर्ते कधीही अनपेक्षित कामगिरी करून जातील हि अशा ठेवायला हरकत नाही.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!