देव दिपावली व दिपोत्सव

  • pic
  • ग्रामदैवत मारुतीरायांचा महारुद्राभिषेक आणि मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजाळुन प्रकाशित करणे व फटाक्यांची आतिषबाजी असे या उत्सवाचे स्वरुप. गावचे ग्रामस्थ श्री.अर्जुन झिंजाड, पंढरीनाथ भोसले,गुलाब सु. चौधरी व निळकंठ झिंजाड व त्यांच्या सहकार्यांनी मिळून बालप्रतिपदेला या कार्यक्रमाची सुरवात केली.

    संपूर्ण गावच्या सुख,शांती,आणि समृद्धि करीता हनुमंतरायांचा महारुद्राभिषेक केला जातो व गावच्या सौख्याकरीता प्रार्थना केली जाते. दिवसभर मारुतीरायांचा अभिषेकाचा कार्यक्रम चालतो सर्व पूजाविधी ह.भ.प. रंगनाथ गुरूजी झिंजाड करतात. सायंकाळी सर्वांना पणत्या दिल्या जातात सर्व जण मिळून मंदिर व परिसरात पणत्यांची आरास करतात.

    गावातील जेष्ठानच्या हस्ते मारुतीयांन समोरची पणती पेटवून दिपोत्सवास सुरुवात होते. उपस्थित सर्व जण पणत्या प्रज्वलीत करण्याचे काम करतात संपूर्ण मंदिर परिसर हजारो दिपांनी उजळून निघतो. हा अदभुत सोहळा पाहण्या सारखा असतो. गाव आणि स्वत वरील संकट टाळण्यासाठी एक दिवा प्रज्वलीत करावा असा सर्वांचा मानस असतो.

    दिपोत्सवानंतर सुंदर अशी फटाक्यांची अतिषबाजी केली जाते. संपूर्ण गाव हा सोहळा पाहत असतो. प्रसाद वाटून आणि सर्वांना दिपावळीच्या शुभेच्छा देवून एक विलक्षण सोहळा मनात साठवुन सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता होते. तरुण मुंबईकर वर्गाच्या आर्थिक साहयातून व गावकर्यांच्या सहकार्यातून हा विलक्षण सोहळा दरवर्षी साजरा होतो.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!