• गावाच्या पूर्वेला वसलेली आणि साधारणत गावाची अर्धी लोकवस्ती असलेली वाडी म्हणजे वरंगळवाडी. पिंपळगाव रोठा रस्त्याला डोंगरापर्यंत वसलेली हि वाडी, सण १९८० साली तरुणांनी एकत्र येवून गणेशोस्तव साजरा करू लागली. आणि इथूनच गणेश तरुण मित्र मंडळाची स्थापना झाली. "इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी" या उक्तीप्रमाणे दिवसेंदिवस मंडळाची प्रगती होत गेली. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये मंडळाने सक्रिय सहभाग घेतला.

  कै. पंढरीनाथ नारायण झिंजाड, कै. दत्तात्रय त्रिंबक चौधरी, कै. गंगाराम बबन मोरे व कै. दत्तात्रय चिमाजी चौधरी यांनी मंडळाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता. या सर्वांच्या आठवणी आजही मंडळात सद्भावनेने जपल्या जातात.श्री निवृत्तीनाना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे काम अतिशय नियोजनबद्ध आणि मोठ्या जोशात चालू आहे.

  सण २०१० साली मंडळातील काही तरुणांनी एकत्र येवून हरीनाम सप्ताहाचे आयोजन चालू केले. मंडळातीलच ८-१० कार्यकर्त्यांनी सगळी आर्थिक बाजू सांभाळून २०१० पासून सप्ताह चालू आहे. पाच वर्षानंतर सगळ्यांच्या सहकार्यातून पाच दिवस हरीनाम सप्ताह व रोज सायंकाळी महाप्रसादाचे नियोजन केले जाते.

  मंडळाचे उत्कृष्ट असे लेझीम पथक आहे. गावातील प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात हे पथक सहभागी असते. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातून उरलेल्या पैशातून मंडळाने स्वयंपाकाकरिता लागणारी भांडी विकत घेतली आहेत. हि भांडी भाड्याने देवून येणाऱ्या पैशातून मंडळाला थोडा आर्थिक आधार मिळतो.

  मंडळाची एकी आणि कार्यतत्परता यासाठी मंडळ पंचक्रोशीमध्ये नावाजले जाते. शिवजयंतीचा कार्यक्रमही मंडळ मोठ्या उत्साहात साजरा करते. गावाच्या जडणघडणीत आणि ग्रामविकासाकरिता मंडळाचा सहभाग मोलाचा आहे.


  श्री गणेश तरुण मित्र मंडळ, वरंगळवाडी.
  अखंड हरिनाम सप्ताह २०१७
  किर्तन वेळ रात्री ७ ते ९
  दि.१.०९.२०१७ शुक्रवार ह.भ.प.शिवविख्याते केशव महाराज जगदाळे (बाभुलवडे).
  दि.२.०९.२०१७ शनिवार ह.भ.प.हनुमंत महाराज झिंजाड (गारखिंडी).
  दि.३.०९.२०१७ रविवार ह.भ.प. ज्ञानेशकन्या अर्चनाताई गिरी (संगमनेर).
  दि.४.०९.२०१७ सोमवार ह.भ.प. शिवशाहीर कल्याण महाराज काळे (शेवगावकर).
  दि.५.०९.२०१७ मंगळवार सकाळी ९ ते ११ ह.भ.प. भागावताचार्य गणेश महाराज शिंदे (उदापूर) यांचे काल्याचे किर्तन.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!