• pic
 • गावाला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने या संस्थेची स्थापना करण्यात आली.साम व सकाळ वृत्तपत्र समुहाने सुरु केलेल्या "सर्व जल अभियान" या योजनेने प्रेरित होवून आणि या अभियांनाचा उपयोग आपल्या गावाकरिता करून घेता यावा हा मंडळाच्या स्थापने मागचा मुख्य उद्देश. गावातील सर्व जेष्ठ व तरुण मुंबईकर मंडळी या करिता एकवतली. दि. १४.०९.२०१४ रोजी सकाळी ११ वा. सि.बी.ड़ि. बेलापूर येथे त्या संधर्भात पहिली मिटिंग आयोजित करण्यात आली.श्री अर्जुन अण्णा झिंजाड यांच्या अध्यक्षते खाली मिटिंग सुरु करण्यात आली. साम टीव्ही च्या प्रतिनिधींनी संपूर्ण मिटिंगचे चित्रीकरण केले.गावातील सर्वांनी पाणी प्रश्न कसा प्रगल्भ आहे याची चर्चा केली. गावच्या पाणी प्रश्नाचे व इतर ग्रामविकासाची कामे या मंडळाच्या मार्फत करायची व मंडळाचे संपूर्ण काम व नियोजन तरुण वर्गाने करायचे असे ठरवण्यात आले.

  गावचे दैवत गारेश्वराच्या नावाने मंडळाचे नाव श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान असावे असे सर्वानुमते ठरले. श्री दादाभाऊ (दादू) पोपट चौधरी याने मंडळाचे नेतृत्व करावे असे सर्वानुमते ठरले.मंडळाच्या माध्यमातून काम करताना तरुणांचा सहभाग अतिशय मोलाचा असतो.

  मंडळाच्या माध्यमातून काम करत असताना सकाळ नवी मुंबई समूहाचे मुख्य संपादक श्री पद्मभूषण देशपांडे यांच्या माध्यमातून संगमनेर येथे कार्यरत असणाऱ्या "लोकपंचायत" या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेशी ओळख झाली. लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष श्री सारंग पांडे साहेबांनी खूप मोलाची मदत केली.त्यांच्या माध्यमातून पुढे बायफ मित्रा या सेवाभावी सामाजिक संस्थांची ओळख झाली. संस्थेचे महाराष्ट्राचे मुख्य अधिकारीश्री. दयासा साहेब व त्यांच्या सोबत श्री मंगेश क्षिरसागर व श्री सुभाष रनमोडे यांनी गावाला भेट देवून बायफ मित्रा संस्था गावात काम करतील याची खात्री दिली.या अधिकाऱ्यांची गावाप्रतीची तळमळ विलक्षण असते.

  दरम्यानच्या काळातही मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात आले त्याची माहिती आपल्याला पुढे सविस्तर मिळेलच. अशा प्रकारे गावच्या पाणी प्रश्नाकरिता व ग्रामविकासाकरिता बनवण्यात आलेल्या या मंडळाची गावाकडे राहणारे व मुंबईकडे राहणारे असे मिळून एक कमिटी बनवण्यात आली आहे.मंडळाच्या कामात सर्व तरुण व जेष्ठ हिरहिरीने भाग घेतात व कार्य सिद्धीस नेतात. सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नाही म्हणून या कार्यास हातभार लावणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार.


  श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान कार्यकारणी
  १.
  २.
  ३.
  ४.
  ५.
  ६.
  ७.
  ८.
  ९.
  १०.
  ११.
  १२.
  १३.

  श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानची आत्ता पर्यंतची वाटचाल

  श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानची सुरुवात
  ( श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानची सुरुवात कशी झाली माहिती वरील लिंक वर)
  सकाळभवन मिटिंग बेलापूर
  ( सकाळभवन बेलापूर येथिल मिटिंगचा वृतांत वरील लिंकवर)
  "दसरा" प्रत्येक्ष कामाला सुरवात 'करतारा' भागातून
  ( दि.०३.१०.२०१४ रोजी "दसरा" शुभ मुहूर्तावर प्रत्येक्ष कामाला सुरवात 'करतारा' भागातून त्याचा वृतांत वरील लिंकवर )
  "बलिप्रतिपदा" कोरठन रोड 'दरा' येथे दगडी बांधाचे काम
  ( दि.२४.१०.२०१४ रोजी "बलिप्रतिपदा" शुभ मुहूर्तावर कोरठन रोड 'दरा' येथे दगडी बांधाचे काम झाले त्याचा वृतांत वरील लिंकवर )
  NSS कॅम्प बाबत कामोठे व गारखिंडी येथे मिटिंग
  ( NSS कॅम्प बाबत कामोठे व गारखिंडी येथे मिटिंग झाली वृतांत वरील लिंकवर )
  "प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अळकुटी महाविद्यालयाचा NSS कॅम्प "विशेष कार्य शिबीर"
  ( दि.०८.१२.२०१४ ते १४.१२.२०१४ या काळात "प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अळकुटी महाविद्यालयाचा NSS कॅम्प "विशेष कार्य शिबीर" झाले त्याचा वृतांत वरील लिंकवर )
  गावाला वरदान स्वरूप लाभलेल्या "बायफ मित्रा" संस्थेचे आगमन
  ( गावाला वरदान स्वरूप लाभलेल्या "बायफ मित्रा" संस्थेचे आगमन व त्यांनी आत्ता पर्यंत केलेल्या भरघोस कामाचा वृतांत वरील लिंकवर )
  "बायफ मित्रा" संस्थेचा शेतकरी अभ्यास दौरा
  ( दि.०१.०९.२०१५ ते ०२.०९.२०१५ रोजी राहुरी, इगतपुरी,जव्हार येथे "बायफ मित्रा" संस्थेचा शेतकरी अभ्यास दौरा झाला त्याचा वृतांत वरील लिंकवर)
  लोकवर्गणीतून स्मशानभूमी जवळील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती व नुतनीकरण
  ( दि.१२.११.२०१५ रोजी लोकवर्गणीतून स्मशानभूमी जवळील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम झाले वृतांत वरील लिंकवर)
  "उरळी कांचन" प्रशिक्षण शिबीर
  ( दि.२४ व २५ नोव्हेंबर २०१५ रोजी "उरळी कांचन" प्रशिक्षण शिबीर झाले त्याचा वृतांत वरील लिंकवर)

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!