गावाला वरदान स्वरूप लाभलेल्या "बायफ मित्रा" संस्थेचे आगमन
 • pic
 • "बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊडेशन"
  गावाला वरदान स्वरूप लाभलेल्या"बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊडेशन" या सेवाभावी संस्थेशी संपर्क झाला.पाहणी करून त्यांनी गावांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली.बायफ संस्थेचे अधिकारी श्री.सुभाष रनमोडे व श्री.आदिनाथ शिरसाठयांनी कामाची सुरवात केली.जमिनीची धूप थांबवण्यासाठी शेतजमिनींची बांधबंधीस्ती करणे गरजेचे होते.त्या हेतूने संपूर्ण गावच्या शेतजमिनी, पडीक,रानमाळ जमिनींचा गट नंबर नुसार सर्वे करण्यात आला. त्या शेतजमिनीवर काय उपाययोजना करता येतील त्या बाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची कामाकरिता संमती घेण्यात आली. गावातील ओढ्यावर सिमेंट बंधारे,दगडी बंधारे,माती बंधारे,जाळी बंधारे यांचा सर्वे करण्यात आला.त्याचा एक बायफ कडून प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला.
  अशा रीतीने बायफ संस्थेचे काम सुरु झाले.

  लोकजनजागृती साठी भारुड कार्यक्रमाचे आयोजन
  दूरदर्शन व आकाशवाणी कलावंत सुप्रसिद्ध विश्वविक्रमी भारुडकर निरंजन भाकरेयांचा ग्रामविकास व जलसंधारण पर जनजागृती विषयक कार्यक्रम दि.१३ मार्च २०१५ रोजी रात्री ८ वा. आयोजित करण्यात आला. रात्री पाऊस झाल्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी ८ वाकार्यक्रम पार पडला.भाकरे साहेबांनी जलसंधारणाचे महत्व लोकांना समजून सांगितले.कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची उपस्थिती होती.संपूर्ण नियोजन व खर्च बायफ संस्थेने केला.

  बायफ संस्था व आय.टी.सी कंपनीच्या वतीने कामाचा शुभारंभ
  मार्च २०१५ व एप्रिल २०१५ या काळात बायफ संस्थेने गावाचा सर्वे पूर्ण केला त्याचा अहवाल व आराखडा आय.टी.सी कंपनी कडे पाठवण्यात आला. त्यांच्या कडून तो समंत करून काम करण्याची तयारी दर्शवली, कंपनीच्या वतीने एक शिष्ट मंडळ येवून गावची पाहणी करून गेले. दि.१० एप्रिल २०१५ रोजी प्रस्तावित सिमेंट बंधारे व इतर बंधार्यांचा सर्वे झाला. काही तांत्रिक अडचणी मुळे थोडा वेळ गेला जुलै २०१५ सुरवातीला कामास परवानगी व आय.टी.सी कंपनी कडून बायफ संस्थेकडे निधी उपलब्ध झाला.
  दि.०८ जुलै २०१५ रोजी सकाळी १० वा गावातील "बोरपटा" या भागातून ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये जेसीबी च्या साह्याने शेतीच्या बांधबंधीस्तीच्या कामाला सुरवात झाली.
  pic
  संस्थेच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाची गावाला भेट
  दि.१८ जुलै २०१५ रोजी सकाळी १० वा. विविध राज्यातील पण बायफ संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गावाला भेट देवून पाहणी केली. संस्थेच्या वतीने श्री मंगेश क्षीरसागर व श्री सुभाष रनमोडे यांनी कामाची माहिती दिली.तसेच ग्रामस्थांच्या वतीने श्री.विश्वनाथ झिंजाड,अर्जुन आण्णा झिंजाड, दादू चौधरी, निवृत्ती बबन चौधरी,संतोष रावजी झिंजाड यांनी उपस्थितांना गावची परिस्थिती समजावून सांगितली. गोकुळ चौधरी यांनी सर्वांच्या नाश्त्याची व चहापानाची व्यवस्था केली.
  pic
  लोकजनजागृती साठी पुन्हा एकदा भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन
  दूरदर्शन व आकाशवाणी कलावंत सुप्रसिद्ध विश्वविक्रमी भारुडकर निरंजन भाकरे यांचा ग्रामविकास व जलसंधारण पर जनजागृती विषयक कार्यक्रम दि.१५ ऑगस्ट २०१५ रोजी संध्याकाळी ६.३० ते १० वा.या वेळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
  pic
  श्रमदान व बायफ चे मुख्य अधिकारी श्री.दयासा साहेब यांची गावाला भेट
  दि.२१ व २२ ऑगस्ट २०१५ या दिवशी श्रमदान करण्याचे ठरवण्यात आले. गावात दवंडी देवून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून गावातून बाहेर असनाऱ्या ग्रामस्थांपर्यंत सूचना पोहचावण्यात आली. संपूर्ण गावातील नागरिकांनी सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात बांधबंदिस्तीच्या कामावर शेपिंग करण्यासठी श्रमदान केले.
  दि.२२ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी बायफ चे मुख्य अधिकारी श्री. दयासा साहेब व त्यांचे सहकारी श्री.कोते साहेब यांनी कामाला भेट दिली.लोकसहभागाबाबत सर्वांचे कौतुक केले आणि पुढील कामासाठी सहयोग देण्याचे आश्वासन दिले. महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने हजर होते १०-१० जणांचे ग्रुप करून मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. सर्वांच्या सहभागातून मोठे काम पार पडले.
  pic
  L.B.S. (दगडी बांध) व जाळी बांधाच्या कामाला सुरवात
  दि.१ सप्टेंबर २०१५ रोजी प्रस्तवित जागी बांधाच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्या कामात उत्तम काम करण्यात पारंगत असणारे कारागीर व मजूर बाहेरून मागवून संस्थेने उत्कृठ दर्जाच्या बांधाची निर्मिती गावात केली.गावात आत्ता पर्यंत जवळपास ३०० दगडी बांध व १०० जाळी बांध बनवण्यात आले आहेत अजूनही गरज असणाऱ्या भागात बांधांचे काम सुरु आहे.
  pic
  संस्थेच्या माध्यमातून पक्के सिमेंट बंधारे,शेततळी,बुरा कंपोस्ट खत प्रकल्प,फळबागा,शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचाचे वाटप,वृक्षारोपण,जुने बंधारे सफाई अशी अनेक कामे झाली आहेत व काही सुरु आहेत त्याची माहिती वेगळ्या लिंक वर लवकरच उपडेट केली जाईल. (टीप:- वर दिलेली माहिती हि संक्षित स्वरुपात दिली आहे.काम व त्या बाबत विस्तृत माहिती लवकरच अद्यावत केली जाईल,धन्यवाद.)

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!