• pic
  • गारखिंडी गावाचे आराध्यदैवत, गावाचा पालन व तारण कर्ता म्हणजे हनुमंतराया. गावच्या मध्यावर हनुमंतरायाचे मंदिर आहे. सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीचे हे मंदिर असल्याचे गावातील जुन्या जाणत्या व्यक्तींकडून सांगितले जाते. पूर्वी माळादी धाब्याचे मंदिर होते. पुरातन झाल्यामुळे पावसाळ्यात मंदिरात पाणी गाळण्याचा त्रास होवू लागला. सण १९७८ साली मंदिरात लोकवर्गणी काढून हरीनाम सप्ताहाला सुरुवात झाली. त्याच रकमेतून १९८० साली मंदिर दुरुस्तीचे काम करण्यात आले. मंदिरावर कौलारू छप्पर टाकण्यात आले. आजही हे कौलारू स्वरूपातील काम सुस्थितीत आहे. याच हनुमंत रायाच्या हरीनाम सप्ताहाच्या २४ वर्षपूर्ती निमित्ताने २००२ साली गावात पंढरी सोहळा आयोजित केला होता. त्यावर्षी मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली. मा. खासदार बाळासाहेब विखे साहेब यांच्या खासदार निधीतून व लोकवर्गणीतून सण २००४ साली मंदिरासमोर मोठा सभामंडप उभारण्यात आला. तसेच देवालयाच्या बाजूलाच आमदार विजयराव औटी यांच्या आमदार निधीतून आणखी एक सभा मंडप बांधून समोरील ओट्याचे काम करण्यात आले. यामुळे मंदिर परिसराची शोभा आणखी वाढली.

    गावातील मारुतीरायाचे हे देवस्थान अतिशय जागृत आहे. सर्पदंश झालेली व्यक्ती मंदिरात आणली तर कोणताही इलाज न करता ती व्यक्ती बरी होते अशी धारणा आहे तसेच अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारे सर्वांचे श्रद्धास्थान असेलेला आमचा मारुतीराया गारखिंडी गावाचा कर्ता-करविता आणि पाठीराखा आहे.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!