• गावाचे ग्रामदैवत मारुतीरायाच्या प्रांगनात या मंडळाचा गणेशोत्सव साजरा होतो. श्री.विश्वनाथ रामदास झिंजाड यांनी गावातील तरुणांना एकत्र करून रान २००० साली या मंडळाची स्थापना केली. कथा,कीर्तने, प्रवचने, वाख्याने, सामाजिक चित्रपट अश्या अनेक माध्यमातून प्रबोधनाचे आणि लोकजागृतीचे अनेक कार्यक्रम या मंडळाने सुरुवातीच्या काळापासून राबवले. पुढील काळात गणपती उत्सवासाठी होणारा अनाठायी खर्च बंद करून गणपती विसर्जन अतिशय साध्या टाळ-मृदुंगाच्या साथीवर भक्तिमय वातावरणात करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. मंडळाच्या या धोरणाची सर्व ग्रामस्थांकडून नेहमी प्रशंसा होत असते. गावातील ग्रामविकासाच्या तसेच सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यांमध्ये मंडळाचा सहभाग सक्रिय असतो. अतिशय होतकरू तरुणांच्या एकत्रीकरणामुळे गावातील सामाजिक कार्यक्रम अतिशय एकोप्याने साजरे होतात.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!