• pic
  • गावठानाला लागुनच ओढ्याच्या काठावर अतिशय रम्य वातावरणात हि दोन्ही मंदिरे वसलेली आहेत. श्री मळगंगा मातेचे अधिष्ठान खूप पुरातन काळापासून या ठिकाणी असल्याची माहिती आहे.आपल्या भक्तांच्या ओढी पोटी मळगंगा माता गावात वास्तव्यास आली अशी माहिती जुने जाणते गावकरी भक्त सांगतात. अतिशय पुरातन असे दगडी चिरे देवीच्या स्वरुपात या ठिकाणी पूजले जातात. पूर्वी दिवा बत्ती पुरते छोटेसे मंदिर या ठिकाणी होते पण सन २००८ साली गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर मंदिर बाधण्यात आले. सन २००८ साली हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराचे उद्घाटन करून देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी हनुमान जयंतीला मळगंगा देवीचा यात्रात्सोव साजरा केला जातो. देवीचे मांडव डहाळे, बाळगोपाळ, सुवासिनी, जागरण गोंधळ असे कार्यक्रम आयोजित केले जातात. सायंकाळी सगळ्या गावाला महाप्रसाद देण्यात येतो.

    लिंबामाता देवीचे हे जागृत देवस्थान भक्तांची विघ्न दूर करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. २००६ पर्यंत अगदी लहान मंदिर होते पण साली देवालयाचा जीर्नोधार करण्यात आला. मा.श्री अण्णा हजारे यांच्या हस्ते कलशारोहनचा कार्यक्रम पार पडला. मार्गशीष महिन्यात देवीचा यात्रा उत्सव मोठ्या हर्ष-उल्हासात साजरा केला जातो. यात्रे निमित्त मांडव डहाळे, मातेचे दंडवत, सुवासिनी -बाळगोपाळ ई. कार्यक्रम या ठिकाणी साजरे होतात. मंदिर आणि यात्रा उत्सवात खंडेश्वर मित्र मंडळाचा मोठा सहभाग असतो.

    दोन्हीही माता सदैव आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता आणि कल्याणाकरिता सज्ज असतात त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांची त्यांच्यावर अतोनात श्रद्धा आहे.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!