गणेशोत्सव व नवरात्रीत्सव

  • pic
  • विखुरलेल्या लोकसमुदाय एकत्र येईल विचारांची देवान घेवाण होईल आणि त्यातुन समाजाला विकासाची,उत्कर्षाची दिशा मिळेल या उदात्त ध्येयाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरवात केली.
    हेच ध्येय समोर ठेवून गावात मंडळे गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व हर्ष उल्हासात साजरा करतात. गावामध्ये जय हनुमान बहुउद्देशीय प्रतिष्ठाण,श्री गणेश तरुण मित्र मंडळ वरंगळवाडी,श्री खंडेश्वर मित्र मंडळ खळवाडी,पिरसाई मित्र मंडळ तळई व अचानक मित्र मंडळ भाडळेमळा ही मंडळे गणेशोत्सवाचे आयोजन दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने करतात. गाव आणि सर्वांसाठी अभिमानाची गोष्ठ म्हणजे सर्व मंडळाच्या मिरवणुका सोबतच निघतात परंतु कोणत्याही प्रकारचे वाद विवाद, तंटे न होता मिरवणुका सुरळीत पार पाडल्या जातात. सर्व मंडळांच्या कार्यक्रत्यांच्या विचाराने मिरवणुकीचे नियोजन केले जाते व आनंदात विसर्जन करण्यात येते. सर्व मंडळे एकमेकांना सहकार्य करतात.

    शिवझुंजार कला क्रीड़ा व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा होतो. सूंदर अशी विद्युत रोशनाई करुन घटस्थापनेला देवीची स्थापना केली जाते. रोज विविध सामाजिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, रास दांडियांचे आयोजन केले जाते. दसर्याच्या दिवशी मातेची मिरवणूक निघते नंतर विसर्जन होते. गावातील आबाल वृद्ध या कार्यक्रमाचा लाभ घेतात.दरवर्षी नवरात्रोत्सव या मंडळाकडून साजरा होतो.

    गणेशोत्सव आयोजक मंडळे.
    जय हनुमान बहुउद्देशीय प्रतिष्ठाण,
    श्री गणेश तरुण मित्र मंडळ वरंगळवाडी,
    श्री खंडेश्वर मित्र मंडळ खळवाडी,
    पिरसाई मित्र मंडळ तळई,
    अचानक मित्र मंडळ भाडळेमळा.

    नवरात्रोत्सव आयोजक मंडळ.
    शिवझुंजार कला क्रीड़ा व नवरात्रोत्सव मंडळ

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!