• श्री गारेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या संस्थेची प्रक्रिया दिनांक ०२ सप्टेंबर २००९ रोजी सुरु झाली. श्री.पंढरीनाथ राधुजी भोसले यांनी प्रथम संस्थेची संकल्पना श्री. अर्जुन झिंजाड यांच्याकडे मांडली, दि. २५ मार्च २०११ रोजी सर्वांच्या प्रयत्नांना यश येवून १२३, साई चेंबर, प्लॉट नं-४४,सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणीसंस्थेची स्थापना झाली. संस्था स्थापनेवेळी केवळ १०० सभासद संख्या होती. पारनेर तालुक्यातील कष्टकरी, गरजू, मध्यमवर्गीय, नोकरदार,व्यावसायिक लोकांना एकत्र आणुन संस्थेचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष श्री.गुलाब सुदाम चौधरी व श्री.अर्जुन भाऊ झिंजाड - संस्थापक उपाध्यक्ष व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने संस्थारूपी छोटेसे रोपटे लावले. संस्थेचे भगवान श्री गारेश्वर या ग्रामदैवताच्या नावावरून श्री गारेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई असे नामकरण केले.

    मा.श्री.लक्ष्मण गाजरे यांचे मोलाचे मार्गदर्शन संस्थेच्या उभारणीत आहे. संस्थेची सुरुवात करत असताना प्रथमत: जागेची अत्यंत महत्वाची समस्या होती. श्री.नवनाथ शंकर चौधरी यांनी उदात्त हेतू समोर ठेवून १२३, साई चेंबर, प्लॉट नं-४४,सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी स्वत:च्या कार्यालयामध्ये संस्थेस जागा देवून महत्वाची समस्या सोडविली.

    श्री.पंढरीनाथ राधुजी भोसले,श्री.निळकंठ रंगनाथ झिंजाड,श्री.विश्वनाथ रामदास झिंजाड,श्री.कोंडीभाऊ महादू चौधरी,श्री.बाबाजी श्रीधर पावडे,श्री.एकनाथ तुकाराम गलांडे, कैलास सिताराम मोरे,सौ.मनिषा अशोक झिंजाड,श्री.दौलत नारायण चौधरी, श्री.संदीप रभाजी झिंजाड या संचालक मंडळाचा मोलाचा वाटा संस्थेच्या स्थापनेत आहे.

    व्यवस्थापनाची जबाबदारी श्री.संपत रामदास पोखरकर हे अतिशय जोमाने व उत्तम रित्या पाहत आहेत, त्यांच्या अथक प्रयत्नातून आज संस्थेचे एकही टक्का कर्ज थकित नाही.

    संस्था स्थापनेपासून आजपर्यंत सर्व आजी - माजी संचालकांनी निस्वार्थी वृत्तीने व नियोजनबद्ध कामकाज केले आहे. संस्थेच्या ६ वर्षाच्या वाटचालीचा मागोवा घेतला असता तसेच संस्थेची आर्थिक स्थितीचा विचार केला असता या कालावधीमध्ये संस्थेने केलेल्या प्रगतीचा प्रत्येक सभासदास निश्चितच अभिमान वाटेल.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!