• आपल्या गावातील पीरसाहेबा या देवावरच्या श्रद्धेपोटी आपल्याही वस्तीवरील तरुणांची एकी झाली पाहिजे आणि त्यातून काही सण-उत्सव, सामाजिक कार्यक्रम आपल्याला करता येतील या हेतूने २०१० साली गोकुळ चौधरी, उद्धव चौधरी, राजू मोरे, भरत चौधरी व मयुर चौधरी यांनी या मंडळाची स्थापना केली. पीरसाहेबा देवास्थानावरील असलेला श्रद्धाभाव आणि वस्तीवरील थोरा-मोठ्यांच्या सांगण्यावरून मंडळाला पीरसाई मित्र मंडळ असे नाव देण्यात आले. मंडळ स्थापन झाल्यानंतर मंडळाने पीरसाहेबाचे मंदिर बांधण्यात मोठे योगदान दिले. पिरसाहेबाच्या उत्सवात मंडळाचा मोलाचा सहभाग असतो. सगळा कार्यक्रम त्यांच्या नियोजनाखाली होतो.

    गावातील विविध सामाजिक कामात मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाग घेतात. मंडळाची एकी आणि लोकसहभाग गावातील प्रत्येक कार्यक्रमात मोलाचा ठरतो.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!