कै.रामदास भाऊ झिंजाड

 • गारखिंडी गावच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारी माणस त्यात कै.रामदास भाऊ झिंजाड यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते. रामदास दादांचा जन्म दि.०१. ०७. १९५३ रोजी झाला. वडिलांची परिस्थिती चांगल्या स्वरुपाची होती त्यामुळे शिक्षण घेता आले. शालेय जीवनापासूनच रामदास दादा अतिशय हुशार आणि होतकरू होते. शालेय शिक्षण झाल्यावर सन १९७५ साली मुंबईला आले. शिक्षण व हुशारीच्या जोरावर त्यांनी "मुंबई पोर्ट ट्रस्ट " मध्ये नोकरी मिळवली. नोकरीला मुंबईला असून देखील गावाकडची ओढ आणि गावच्या विकासाची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे संबंध उत्तम स्वरूपाचे होते. मा.श्री नंदकुमार झावरे आमदार असताना रामदास दादांनी गावातील शाळेसाठी तीन खोल्या मंजूर करुन त्या बनवून घेतल्या. पुढे सन १९८४ साली त्यांनी आपल्या पत्नी चंद्रभागा झिंजाड यांना गावच्या सरपंच पदी आणले आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे गावात आणली. मा.बाळासाहेब विखे साहेब खासदार असताना त्यांच्या माध्यमातून २५० हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करायची योजना त्यांनी गावात मंजुर करुन आणली.या कामात त्यांना श्री.अर्जुन अण्णा झिंजाड, कै.मधुकर गणपत झिंजाड व कै.साहेबराव शंकर चौधरी यांची मोलाची साथ दिली. परंतु गावचे दुर्दैव शेतकऱ्यांचे अज्ञान या गोष्टीत आडवे आले. शेतीचे ७/१२ वगैरे गोष्टी या कामासाठी लागणार होत्या शेतकऱ्यांनी योग्य पाठिंबा न दिल्याने योजना पूर्ण होवू शकली नाही. रामदास दादा व सहकार्यांची सर्व मेहनत वाया गेली.

  मुंबई मध्ये काम करत असताना मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये त्यांचा चांगला दबदबा होता. ते मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या डायरेक्टर बॉडीवर सुद्धा कार्यरत होते. त्या माध्यमातून त्यांनी ८ ते १० गावच्या व अनेक बाहेरच्या तरुणांना नोकरी मिळवून दिली. किनारा कामगार सोसायटी नावाची संस्था त्या काळात त्यांनी सुरु केली. सोसायटीच्या माध्यमातून कामगारांना मदत मिळवून दिली. त्यांच्याच प्रयत्नातुन पोर्ट मध्ये कँटिंग सुरु करण्यात आली.त्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला.

  गावाबरोबरच इतर गावामध्ये ही त्यांच्या नावाची व कामाची चर्चा होत असे. एकदा शेजारील एका गावातील धनगराची मेंढरे काही कारणाने मोठ्या प्रमाणात मरण पावली.गरीब धनगर हवालदिल होवून रामदास दादांन कड़े आले.आपली हकिगत मंत्री मोहदयांच्या कानावर घालण्याची विनंती केली. रामदास दादांनी अर्जुन झिंजाड यांना ही गोष्ठ कळवली व या गरीबाला मदत मिळालीच पाहिजे असे सांगितले.त्यांचे तीन प्रतिनिधी व अर्जुन झिंजाड यांना घेवून ते मंत्रालयात गेले. तत्कालीन मंत्री मा.प्रकाश बापू शेडगे यांची भेट घेवून धनगरांना मदत मिळवून दिली.

  हे सर्व करत असतानाही गावच्या मातीची ओढ काही त्यांना गप्प बसु देत नव्हती.परिणामी नोकरी सोडून ते गावी आले. वडिलोपार्जीत असणाऱ्या शेतीचा संपूर्ण कायापालट त्यांनी केला. सिताफळ,हापुस आंबा,सागवान आशा बागा त्यांनी आपल्या शेतात लावल्या. आपल्या शेतीच्या सुधारनेबरोबरच इतर शेतकऱ्यांनाही त्यांनी मोलाची मदत केली. गावामध्ये शेतीत नगदी पिके घेण्यास खऱ्या अर्थाने त्यांनी सुरवात केली त्या करीता त्यांनी शेतकऱ्यांना प्ररित केले.

  समाजाची आस असणारे दादा सर्वांना हवेहवेसे वाटायचे.संपुर्ण गावात त्यांचा आदरयुक्त दरारा होता. त्यामुळे राजकीय व सामाजिक गोष्टीत चुकीची कामे करायला कुणी धजावत नसे. पण म्हणतात ना 'जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला' या उक्ति प्रमाणे देव ०७.०८.१९९६ रोजी त्यांना आपल्यातून घेवून गेला. रामदास दादांच्या या अकस्मात निधनाने कुटुंबाबरोबरच गावचीही खुप मोठी हानी झाली. रामदास दादांच्या अपत्यापैकी मुलगी उज्वला ही तालुक्यातील पळसपुर या ठिकाणी एका उच्च घरात नांदत आहेत. दादांना दोन सुपुत्र विश्वनाथ व सतीश. विश्वनाथ झिंजाड हे आपल्या वडिलांचा वारसा नेटाने जपत आहेत. गावच्या विकास कामात त्यांचा सहभाग मोलाचा असतो. असे हे रामदास दादा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. दादांना विनम्र अभिवादन.गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!