• pic
  • स्वातंत्र्य काळात शिक्षणाचे वारे देशभर वाहू लागले. गावातही त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सन १९५९ साली जिल्हा परिषदच्या शाळेची गावात सुरुवात झाली. शाळेसाठी त्याकाळी इमारत उपलब्ध नव्हती, गावाने लोकवर्गणीतून शाळेची खोली बनवून त्यात शाळा सुरु करण्यात आली. पुढील काळात विध्यार्थीसंख्या वाढली, जागेची कमतरता भासू लागली.राशनची माता आणि मुक्ताई देवीचे मंदिर या कार्यासाठी वापरण्याचे ठरले. मंदिराच्या वरचे छत काढून दोन मजली शाळा त्या ठिकाणी उभी राहिली. शिक्षणाचे कार्य सुरळीत चालू झाले. पुढे काही काळाने इमारती जीर्ण होत गेल्या आणि त्याची पडझड होवू लागली. दरम्यानच्या काळात तत्कालीन आमदार नंदकुमार झावरे यांनी त्यांच्या आमदार निधीतून तीन नवीन खोल्यांचे काम करून दिले. त्यानंतर सगळ्या गावकर्यांनी पुढाकार घेवून लोकवर्गणीतून शाळेकरिता पक्की इमारत बनवली. सन १९९७-९८ साली शाळेच्या नवीन इमारतीचे काम चालू झाले. गावापासून थोड्याश्या अंतरावर पण लोकवस्तीतच प्रशस्त पटांगनाच्या बाजूला सुंदर इमारतीचे निर्माण करण्यात आले. दि. २५/०१/१९९८ साली पद्मभूषण मा. श्री. अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते नवीन वस्तूचे उद्घाटन पार पडले आणि नवीन इमारत सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली पुढे सौ. शालिनीताई विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष असताना षटकोनी शाळांची योजना जिल्हाभर सुरु झाली, त्या योजनेतही शाळेला चार नवीन खोल्या आणि स्वच्छतागृह मिळाले.

    शाळेच्या सुरुवातीच्या काळापासूनच शाळेला खूप चांगले मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग लाभत गेला त्यामुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख नेहमी चढता राहिला. श्री. शंकर पराजी जगदाळे, श्री शिवाजी शिरोळे, श्री म्हल्हारी किसान भोसले, श्रीयुत झावरे, श्री गोपीनाथ माधव पावडे, चांद हुसैन शेख, श्री देवराम आवारी, श्री ठुबे , सौ आशा वैद्य, सौ, उज्वला झिंजाड अशा अनेक शिक्षकांचे कार्य शाळा, गाव आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचे ठरले आहे. श्री. रामदास चिकने यांनी शाळेचे सुशोभीकरण केले आणि त्यांना श्री गोविंद रेपाळे, श्री भाऊसाहेब कोरडे, श्री ज्ञानोबा राठोड, श्रीमती शीतल दाते यांनी मोलाची साथ दिली. उल्लेख केलेल्या सगळ्या शिक्षकांनी आपापल्या काळात शाळेच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावला आणि पारनेर तालुक्यात एक नावजलेली शाळा म्हणून नावलौकिक मिळवला. चिकने गुरुजींच्या निवृत्तीनंतर श्री. बाबाजी मंजाभाऊ राउत यांनी शाळेच्या उन्नतीचे काम जोरात चालू ठेवले आहे.

    शाळेतील प्रांगणात व खोल्यांच्या भिंतीवर अनेक महापुरुषांचे फोटो आणि सामान्य ज्ञानाची माहिती रेखाटली आहे. त्याकरिता गावातील खूप लोकांचे सौजन्य आहे. शाळेत स्वतंत्र संगणक कक्ष आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेने दिलेले दोन, श्रीगणेश तरुण मित्र मंडळाने दिलेला एक आणि पंढरीनाथ भोसले, विश्वनाथ झिंजाड, गोकुळ चौधरी, विक्रम चौधरी, दत्ता चौधरी, संदीप झिंजाड, संपत पोखरकर व दादू चौधरी यांनी मिळून एक असे एकूण चार संगणक उपलब्ध आहेत. कै. इंदुबाई शिवाजी चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री. राजेंद्र शि. चौधरी आणि शेखर शि. चौधरी यांनी डिजिटल एज्युकेशन हि संकल्पना राबवून त्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण दिले जाते.

    पिण्याच्या पाण्याकरिता बोरवेलची सोय आहे. त्यासाठी श्री दौलत नारायण चौधरी शाळेला पाण्याची मोटार भेट म्हणून दिली. शिवझुंजार कला क्रीडा आणि नवरात्रोत्सव मंडळाने शाळेच्या ध्वजाचे काम करून दिले. अशा प्रकारे सगळ्यांच्या सहभागाने शाळा विविध अंगांनी परिपूर्ण अशी झाली आहे. स्पर्धा परीक्षान्माधेही शाळेची प्रगती उल्लेखनीय अशी असते. याच शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी पदवीधर तसेच मोठे ऑफिसर झाले आहेत. अशी हि आमची शाळा गावाचा आत्मा बनून राहिली आहे. इथे शिकून गेलेल्या प्रत्येकाला शाळेचा एक जिव्हाळा आहे.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!