• टेनिस क्रिकेट विश्वाचा बुलंद आवाज, समालोचन क्षेत्रातील मुलुखमैदानी तोफ कै. सीतारामदादा चौधरी यांच्या कल्पनेतून आणि प्रेरणेतून सण २००८ मध्ये या मंडळाची स्थापना झाली. संपूर्ण गावातील तरुणांची फौज एकत्र करून त्यांच्या माध्यमातून गावात नीरनिराळे सामाजिक उपक्रम राबवण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम सीताराम दादांनी हाती घेतला. त्याच प्रेरणेतून गावात पहिल्यांदा नवत्रात्रोत्सव साजरा होवू लागला. व्याख्याने, कीर्तने, प्रवचने असे कितीतरी कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून गावात होत राहिले. गावात टेनिस क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन होवू लागले.

  पुढील काळात २०११ ला सीताराम दादांचे अकस्मात निधन झाले. पण मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी खचून न जाता दादांचा वासरा पुढे तसाच चालू ठेवला. तो आजतागायत तसाच चालू आहे. त्यानंतरच्या काळात कु.तुषार नामदेव झिंजाड यांच्या अध्येक्षते खाली सर्व तरुण मित्रांच्या सहकार्यातून उत्सव साजरा होतो. मंडळाचा गावातील सगळ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग असतो. गावातील कार्यक्रमांसाठी मंडळ आर्थिक मदतही करते. सीतारामदादांच्या स्मरणार्थ मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच नवरात्रोत्सावाचा कार्यक्रमहि मोठा धडाक्यात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन आणि महाप्रसादाचे आयोजन असते.

  गावच्या सर्वांगीण विकासाची ध्येय आणि धोरणे डोळ्यासमोर ठेवून मंडळाचे कार्य अविरत चालू आहे आणि यापुढेही ते असेच चालू राहील.

  शिवझुंजार कला क्रीडा सांस्कृतिक आणि सार्व.नवरात्रोत्सव मंडळ,गारखिंडी.
  सार्वजनिक नवरात्रोत्सव २०१७ कार्यकारिणी
  संस्थापक अध्यक्ष: कै. सीतारामदादा रंगनाथ चौधरी
  विद्यमान अध्यक्ष: श्री. प्रदीप झिंजाड
  उपाध्यक्ष: प्रवीण झिंजाड
  खजिनदार: श्री. सुनील निमसाखरे
  सचिव: माणिक झिंजाड
  कार्याध्यक्ष: सुजित झिंजाड
  संयोजक: श्री. अनिल झिंजाड
  सहसचिव: तुषार खामकर

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech