• वाडीच्या मध्यावर असलेले खंडोबाचे मंदिर आणि वडाचे विस्तीर्ण झाड हि या वाडीची ओळख आहे. कितीतरी पिढ्यांपासून या दोन गोष्टी प्रत्यकाच्या मनात आठवणी ठेवून आहेत. देव, मंदिर आणि हे झाड म्हणजे वाडीच्या अबाल वृद्धानसाठी मोठा सहारा आहे. मंदिरात येवून किंवा झाडाखाली बसून वाडीच्या प्रगतीसाठी कितीतरी चर्चासत्र झाली असतील याला ते साक्षीदार आहेत. याच खंडोबाच्या मंदिरामुळे वाडीतील तरुणांचा जो समूह तयार झाला त्याला अलीखीतच "खंडेश्वर मित्र मंडळ" हे नाव पडून गेले. पुढे काही सामाजिक कार्यांसाठी मग अधिकृतपने खंडेश्वर मित्र मंडळ नाव रुजू झाले.

    पंचक्रोशीतील गावात गणेशोत्सव साजरे होत आहेत पण आपल्या वाडीतील वृद्ध स्त्री-पुरुषांना यात सहभागी होता येत नाही हि गोष्ट मनासमोर ठेवून सण १९८६ साली श्री. मंजाभाऊ शंकर चौधरी, श्री. बाळू विठ्ठल चौधरी, श्री अशोक बाबाजी चौधरी यांनी पुढाकार घेवून याच खंडेश्वराच्या मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात केली. तोच गणेशोत्सवाचा वारसा आता तरुण पिढीच्या हाती आहे आणि तेसुद्धा चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करतात.

    आधी साध्या स्वरुपात असणाऱ्या या खंडोबाच्या मंदिराचा मंडळाने सण १९९६ साली जीर्णोद्धार करून मा. अण्णा हजारे यांच्या हस्ते कलशारोहन करण्यात आले. तसेच वाडीचे दैवत असलेल्या लिंबामाता देवीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार २००६ साली मा. अण्णा हजारेंच्याच हस्ते करण्यात आला. मंडळाच्या सहकार्यातून गणोशोत्सव आणि लिंबामातेचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

    गावच्या सामाजिक कार्यात आणि धार्मिक कार्यक्रमात मंडळातले कार्यकर्ते हिरारीने भाग घेतात. ग्रामविकासाच्या ध्येयपूर्तीसाठी मंडळ नेहमी कटिबद्ध असते आणि प्रत्येक कामात खारीचा का होईना वाट उचलते हि मंडळाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!