कै.सिताराम रंगनाथ चौधरी (क्रिकेट समालोचक)

 • कै.सिताराम दादांचा जन्म २ फेब्रुवारी १९७१ साली रेनवडी या आजोळाच्या गावी झाला.वडील थोरले असल्यामुळे लहानपनातच वडिलांवर घराची जबाबदारी आली.घरची परिस्थिति तशी बेताचीच आई,वडील,एक भाऊ आणि दोन बहिनी असा सिताराम दादांचा परिवार.लहानपणा पासूनच क्रिकेटची प्रचंड आवड. त्या आवडीतूनच पुढे क्रिकेट समालोचनाला सुरवात केली.समालोचन क्षेत्रातील अनमोल हिरा म्हटले तरी वावगे ठरू नये असे दादांचे कार्य होते. त्यांना सर्व आवडीने दादा म्हणत.अळकुटी येथे डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात चिंचबन मैदानात पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा होते,त्या स्पर्धेला पंचक्रोशीत नावलौकिक मिळवून द्यायचे काम सिताराम दादांनी केले.सामन्याबरोबरच दादांचे समालोचन ऐकण्यासाठी खास लोक मैदानात जमत. गाढ अभ्यास क्रिकेट क्षेत्रातील वाचन आणि चिकाटी या जोरावर त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये प्रचंड नाव कमावले.त्यांची कारकीर्द बहरली ती खोडद ता.जुन्नर जि.पुणे या मैदानावर,खोडदचे मैदान त्यांच्या आवडत्या मैदानापैकी एक होते.

  पारनेर,जुन्नर,आंबेगाव,शिरूर,आकोला,संगमनेर हे तालुके त्यांनी आपल्या आवाजाने मोहित करून टाकले होते.स्वतःच्या नावाबरोबरच त्यांनी आपल्या गारखिंडी गावचा नावलौकिक पंचक्रोशित वाढवला.सिताराम दादांचा क्रिकेट क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातही त्यांचा अभ्यास खुप होता,कोणत्याही कार्यक्रमाच्या स्टेजवर दादा बोलायला उभे राहिले की समोरच्याना मंत्रमुग्ध करुन टाकत.इतका मोठा समालोचक असूनही ते साध्यातल्या साध्या कार्यक्रमातही आवडीने बोलत.

  श्री.जनार्दन आहेर (बॉय) हे क्रिकेट मधून पुढे आलेले व्यक्तिमत्व.या युवकाला जिल्हा परिषद सदश्य पदापर्यंत नेण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता.त्यांची मैत्री ही सर्व पक्षीय होती पण आ.शरदजी पवार साहेब व तालुक्यातील मा.आमदार वसंतराव झावरे यांच्या वर त्यांची आतोणात श्रद्धा होती. म्हणून ते शेवट पर्यन्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सोबत राहिले,टेनिस क्रिकेट क्षेत्रात त्यांनी अनेक खेळाडुंना त्यांनी नावलौकिक मिळवून दिला.

  गावातील जय हनुमान बहुउद्देशीय प्रतिष्ठान या मंडळाचे ते संस्थापकीय उपाघ्यक्ष होते.नंतर त्यांनी शिवझुंजार कला क्रीडा व नवरात्रोउत्सव मंडळाची स्थापना केली.गारखिंडी गावच्या विकास कामात दादांचा सक्रीय सहभाग असायचा.गावच्या मारुतिरायाच्या हरिनाम सप्ताहाचे नियोजन दादा करत, बोलताना इतके प्रभावी बोलत की प्रचंड प्रमाणात देणगी जमा होत असे.प्रभावी बोलण्यामुळे देणगी देण्याचे मनात नसलेला व्यक्ति देणगी देत असे अशी प्रचंड ताकत त्यांच्या वाणीत होती.

  असा हा तेजस्वी तारा अल्पशा आजाराने दि.२२ फेब्रुवारी २०११ रोजी या जगाच्या पटला वरुन निखळला.सर्व क्षेत्रातून त्यांच्या जाण्याची हळहळ व्यक्त झाली आणि आताही होते.त्याच्या अंतकार्यासाठी प्रचंड जनसागर लोटला त्यावरून दादांचा लोकसंपर्क दिसून येत होता.सिताराम दादांचे जाणे कुटुंबा बरोबरच गावचे ही कधीही न भरुन निघणारे नुकसान होते.गारखिंडी गाव व क्रिकेट विश्व एका सच्च्या कार्यकर्त्याला व एका तेजस्वी समालोचकाला मुकले.एक आदर्श मित्र सर्वांनी गमावला.

  सिताराम दादांनी समालोचन क्षेत्रात नाव कमावत असताना अनेक युवक घड़वले.श्री.प्रवीण गायकवाड त्यातील एक दादांचा अतिशय आवडता शिष्य,सोबती मित्र.प्रवीण आजही दादांचा समलोचनाचा वारसा नेटाने जपत आहे.सिताराम दादांच्या पश्च्यात कुटुंबात आई वडील बहिण पत्नी आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.परिवारासोबच संपुर्ण गावाला,मित्र परिवाराला त्यांची उणीव सदैव जाणवत राहील.

  सिताराम दादांसारखी व्यक्ति गारखिंडी गावात होवून गेली ही आम्हा सर्वाकरिता आभिमानाची गोष्ट आहे. लाडक्या दादांना भावपूर्ण आदरांजली.


गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!