• pic
  • गावाच्या मध्यावर चौकातच श्री विठ्ठल रुखमाईचे भव्य असे मंदिर आहे. पूर्वी धाब्याचे पुरातन मंदिर या ठिकाणी होते. सन १९७२ साली काही गावकर्यांनी पुढाकार घेवून कौलारू मंदिर उभारले. कालांतराने हे ही मंदिर जीर्ण झाल्यामुळे मंदिराची पडझड चालू झाली त्यामुळे सगळ्या गावाने एकमताने मंदिर जीर्नोधाराचा निर्णय घेतला. सण २०१४ साली गावकऱ्यांच्या दातृत्वामुळे एक सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिली. १ आणि २ मे २०१४ या दोन दिवशी उद्घाटनाचा आणि मूर्ती प्राणप्रतीष्ठापनेचा मोठे कार्यक्रम आयोजित करून विठ्ठल-रुखमाई सोबतच साईबाबा आणि श्रीकृष्ण यांचीही प्राणप्रतीष्ठापना मंदिरात करण्यात आली.

    मंदिर परिसर अतिशय विलोभनीय तसाच प्रशस्तही आहे. या परिसरात दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळे पार पडतात. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी हिरवळ आणि वृक्षलागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. विठ्ठल-रुखमाई हा गावाचा एक मोठा आधार आहे.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!